28 जणांवर गुन्हा दाखल

मुंबई, (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये बनावट आदेश देऊन शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांच्या संगनमताने बनावट भरती झालेले हे शिक्षक गेले अनेक वर्षे वेतन घेत आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकारी, संस्थाचालक तसेच संबंधित शिक्षक अशा 28 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लेखी उत्तरात सांगितले.

भीमराव तापकीर यांनी विधानसभेत पुणे येथील खासगी अनुदानित शाळांमधील बोगस शिक्षकांच्या नेमणुकांसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नांच्या लेखी उत्तरात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षणाधिकारी व संस्थाचालकांच्या संगनमताने शिक्षक मान्यता आणि तुकड्या मान्यतेचे बनावट आदेश देण्यात आले होते, अशी माहिती दिली. हे शिक्षक संबंधित शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असून वेतनही घेत आहेत. या बोगस शिक्षकांचे प्रकरण गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये उघडकीस आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. शासनाची फसवणूक करून शिक्षकांची नेमणूक करून नियमबाह्यरीत्या शिक्षक व तुकड्या मान्यतेचे आदेश देऊन झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित अधिकारी, संस्थाचालक तसेच शिक्षक अशा 28 व्यक्तिंवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गायकवाड यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा