मुंबई : अभिनेता अजय देवगणचा चित्रपट ’तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ची पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल पाच आठवडे उलटले आहेत, तरीही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 269.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. 10 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाचव्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास हा चित्रपट दंगल आणि पीके या चित्रपटांना मागं टाकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी ’तान्हाजी’ने 1.15 कोटींची कमाई केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा