मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन चंद्रेशखर धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अन्य उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली होण्याच्या शक्यतेने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

सत्यरंजन धर्माधिकारी हे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांच्यानंतरचे सध्याचे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. मागील १६ वर्षांत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात बऱ्याच महत्त्वपूर्ण निकाल व आदेश दिले. मुख्य न्या. नंदराजोग हे २४ फेब्रुवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती मिळावी, अशी धर्माधिकारी यांची अपेक्षा असल्याची चर्चा होती. मात्र, मुंबई ऐवजी अन्य ठिकाणी मुख्य न्यायमूर्ती म्हणून बदली केली जाणार असल्याचे संकेत त्यांना मिळाले होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. धर्माधिकारी यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा पाठवला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा