सर्वोच्च न्यायालयाने निर्भया प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायमूर्ती भानुमती यांना भोवळ आली. यानंतर भानुमती यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कक्षात नेले. सर्वोच्च न्यायालयात ही बाब घडल्याने निर्भया प्रकरणात केंद्र सरकारवरच्या अर्जावरची सुनावणी पुढे ढकलली.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने आपण मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याचा अर्ज केला होता. मात्र विनय हा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. यानंतर न्या.भानुमती या निर्भया प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या अर्जावर सुनावणी घेत होत्या. त्यावेळीच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना चक्कर आली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा