अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि प्रा.आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. मात्र, या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून चार आठवड्यांचे संरक्षण मिळाले आहे.

हा निर्णय न्यायमूर्ती पी.डी.नाईक यांच्या खंडपीठाने दिला. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे जानेवारी २०१८ मध्ये उसळलेल्या हिंसाचारा प्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा, तेलतुंबडे व अन्य काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींचे नक्षवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार उसळला होता. या परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

पुणे सत्र न्यायालयाने मागील वर्षीच्या नोव्हेंबर तेलतुंबडे व नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देताना जामिनावरील निर्णय पुढे ढकलला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा