भारतात जीवाश्म इंधनामुळे प्रदूषण होऊन लोकांना जे रोग होतात, त्याच्या निवारणासाठी आरोग्यावर होणारा खर्च १५० अब्ज डॉलर्सचा आहे,असे मत एका अहवालात व्यक्त झाले आहे. जगात प्रदूषणामुळे होणाऱ्या रोगांवर एवढा खर्च दुसऱ्या कुठल्याही देशात होत नाही. हा अहवाल ‘ग्रीनपीस साउथइस्ट आशिया’ या संस्थेने प्रसिद्धीस दिला असून त्यात ‘सेंटर फॉर रीसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ या संस्थेने दिलेल्या माहितीचा समावेश केला आहे.

भारतात जीवाश्म इंधनांमुळे होणाऱ्या हवा प्रदूषणामुळे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात, त्यामुळे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा ५.४ टक्के भाग खर्च होतो. पीएम २.५, ओझोन व नायट्रोजन ऑक्साइड यामुळे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात त्यांचा विचार करून २०१८ हे वर्ष आधारभूत मानून खर्चाचा अंदाज काढला आहे. जगात प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर एकून वार्षिक सकल उत्पन्नाच्या ३.३ टक्के म्हणजे २.९ लाख कोटी डॉलर्स खर्च होतात. भारतात एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.४ टक्के खर्च हा प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर होतो. हे प्रमाण १०.७ लाख कोटी रुपये म्हणजे १५० अब्ज डॉलर्स आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा