बीजिंग : चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक स्थिती आहे. चीनमधील ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजते. चीनमध्ये आतापर्यंत १५०० हून जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे हुवेई प्रांतातील वुहान शहर सर्वाधिक प्रभावित झाले आहे. याच शहरातून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. चीनमध्ये गुरुवारी एकाच दिवशी तब्बल २५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत जवळपास ६० हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कोरोनामुळे बुधवारी, २४२ जणांचा मृत्यू झाला होता. तर, गुरुवारी २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी, चीनमध्ये कोरोनाबाधित १५ हजार १५२ जण नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. सर्वाधिक मृत्यू हे हुवेई प्रातांत झाले. २५४ पैकी २४२ जण हे हुबेई प्रातांतील नागरिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा