मुंबई, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्ता हातातून गेली असली तरी भाजपने ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील व मंगलप्रभात लोढा यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी व मुंबई अध्यक्षपदी फेरनियुक्ती केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी याची घोषणा केली.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडेच हे पद कायम ठेवण्यात आले आहे. मुंबई अध्यक्षपद बदलले जाईल, अशी चर्चा होती. प्रसाद लाड, खासदार मनोज कोटक यांची नावे चर्चेत होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा