सोलापूर : भारतीय जनता पक्षाला वगळून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजपाचे नेते अस्वस्थ झाले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारवर सातत्याने त्यांच्याकडून टीका करण्यात येत आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील गुरुवारी सोलापूर दौर्‍यावर होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद सुरू असताना महाराष्ट्रातील सरकार आपल्याच कर्माने पडेल असे वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर पडताक्षणी ज्या खुर्चीवर पाटील बसले होते त्या खुर्चीचा पायच मोडला आणि चंद्रकांत पाटील त्यात खुर्चीत खाली कोसळले. मात्र बाजूला बसलेले माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी त्यांना लगेचच हाताला धरल्यामुळे चंद्रकांत पाटील खाली पडताना बालंबाल बचावले. परंतु सरकार पडणार असे म्हणताच चंद्रकांत पाटील सुद्धा तुटलेल्या खुर्चीत पडल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. खुर्ची तुटल्यामुळे चंद्रकांत पाटलांनाही हसू आवरले नाही. मी टीका करतोय ना त्यामुळे तिकडून जरा, असे इशार्‍याने बोलताच एकच हशा पिकली. तसेच आता खातेही बदलेय त्यामुळे असे होते. असा खुमासदार टोलाही त्यांनी लगावला. त्यानंतर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली.

आपणच निवडणूक जिंकलो अशा आविर्भावात शरद पवार आणि त्यांचे पुतणे प्रतिक्रिया देत आहेत. दिल्लीत यांच्या पक्षाला शून्य मते आहेत. अशी टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा