नवी दिल्ली, (पीटीआय) : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस प्रभारी पी.सी. चाको यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. याबरोबरच, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष चोप्रा यांनीदेखील राजीनामा दिला आहे. मी दिल्ली विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आहे. माझ्याकडे कमी वेळ होता. मात्र, तरीदेखील मी सर्वोतोपरी प्रयत्न केले. माझ्या राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे चोप्रा यांनी सांगितले. चोप्रा यांनी याआधी 1998 व 2003 पर्यंत देखील दिल्ली प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभळलेली आहे. शिवाय, 1998 ते 2013 पर्यंत ते सलग तीन वेळा कालकाजी विधानसभा मतदार संघातून विजयीदेखील झालेले आहेत. चाको यांनी पदाचा राजीनामा देतानाच पक्षाच्या पडत्या कामगिरीस 2013 पासून सुरुवात झाली. शीला दीक्षित यांच्या कार्यकाळापासूनच काँग्रेसला उतरती कळा लागली, असे म्हटले आहे. त्यांच्याच कार्यकाळात उदयास आलेल्या आम आदमी पक्षाकडे काँग्रेसचा मतदार ओढला गेला, असेही सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा