मुंबई : भारत-पाकिस्तानमध्ये कित्येक वर्षापासून सुरू असलेला काश्मीर वाद मिटू नये अशी पाकिस्तान लष्कराची इच्छा आहे, असे मत गायक आदनान सामीने व्यक्त केले आहे. २०१६ मध्ये भारताचे नागरिक झालेले अदनान सामी यांच्या मते, जर काश्मीरचा प्रश्न या दोन देशांमध्ये सुटला तर पाकिस्तान लष्कराचा निधी थांबेल. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

काश्मीरसारख्या मुद्द्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच तणाव असतो. दोन्ही देशांमध्ये शांतता का स्थापित होत नाही? याचे उत्तर 60-70 वर्षांपासून शोधले जात आहे, जे राजकारणापेक्षा सैन्यात दडलेले आहे. विशेषत: पाकिस्तानी सैन्यात. कारण काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी त्यांना निधी मिळतो.
ज्या दिवशी काश्मीरचा प्रश्न सुटेल, त्या दिवशी पाकिस्तान लष्कराचा निधी थांबेल. जर आपण त्या घडामोडी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपणास कळेल की, जेव्हा दोन्ही देशांच्या नेत्यांनी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, तेव्हा कुठेतरी हल्ला झाला.कधी ते कारगिल होते. कधी ते पुलवामा होते. असे का होते? ही एक सोपी गोष्ट आहे की, काश्मीरचा मुद्दा संपू नये अशी पाकिस्तानी लष्कराची इच्छा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा