वुहान : कोरोना विषाणूने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. कोरोना विषाणूचे सत्य सर्व जगासमोर आणणारा एका पत्रकार बेपत्ता झाला आहे. चेन क्यूइशी असे या पत्रकाराचे नाव असून 6 फेब्रुवारीपासून तो बेपत्ता आहेत. यापूर्वी चीन सरकारला कोरोनाचा इशारा देणार्‍या डॉक्टरचा मृत्यू झाला होता.

क्यूइशी यांनी समाज माध्यमाच्या मदतीने कोरोनाचे वार्तांकन केले, त्यावेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले. क्यूइशी पत्रकारितेबरोबरच एक मानवाधिकार कार्यकर्ताही आहेत. क्यूइशी यांनी शोध पत्रकारिता करत कोरोनाचे सत्य जगासमोर आणले. मात्र चीन सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आता कोरोनाने जगभरात थैमान घातल्यानंतर क्यूइशी यांचे अचानक गायब होणे, संशयास्पद वाटू लागले आहे. क्यूइशी यांच्या कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, ते आपल्या मित्रांसोबत गुरुवारी रुग्णालयात गेले होते. त्यानंतर ते पुन्हा परतलेच नाहीत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा