गृहमंत्रालयाकडून तांत्रिक कारण पुढे

नवी दिल्ली, (पीटीआय) : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक सूचीसंदर्भातील माहिती एनआरसीच्या संकेतस्थळावरून गायब झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागच्या ऑगस्टमध्ये ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने एनआरसी संदर्भातील सर्व माहिती सुरक्षित आहे. मात्र, काही तांत्रिक तृटींमुळे माहिती क्लाऊडवरून गायब झाली आहे. या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असेही स्पष्ट केले आहे. एनआरसी अधिकार्‍यांच्या मते, आयटी कंपनी विप्रोसोबत असलेल्या कराराचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे संकेतस्थळावरून माहिती गायब झाली आहे. मात्र, सर्व माहिती सुरक्षित आहे. या कराराचे लवकरच नूतनीकरण केले जाईल. त्यानंतर संकेतस्थळावर माहिती पुन्हा दिसेल.

दरम्यान, आसाम विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबाब्रता साकिया यांनी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाला पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 31 ऑगस्ट 2019 रोजी एनआरसीची अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा