अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या मार्गातील झोपड्या दिसू नयेत म्हणून एक खास भिंत उभारण्यात येत आहे. हा निर्णय अहमदाबाद महापालिकेने घेतला. सरदार वल्लभभाई पटेल विमानतळ आणि इंदिरा ब्रिज या भागात काही झोपड्या आहेत. त्या ट्रम्प यांना दिसू नयेत म्हणून ही भिंत उभारण्यात येत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच या मार्गातल्या झोपड्या लपवण्यासाठी भिंत बांधली जाते आहे.

महापालिकेने दिलेल्या कामानुसार तूर्तास अर्धा किलोमीटरची भिंत आहे. या भिंतीची उंची सहा ते सात फूट असणार आहे. दरम्यान या सगळ्या प्रकाराबाबत अहमदाबाद महापालिकेच्या महापौर बिजल पटेल यांना विचारले असता, ”मला अशा कोणत्याही बांधकामाची माहिती नाही, मी असे काहीही बांधकाम पाहिलेले नाही” असे म्हणत त्यांनी कानावर हात ठेवले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा