जिनीव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने ‘करोना’ विषाणूला नवीन नाव दिले आहे. करोना विषाणूला आता ‘कोविड-१९’ असे अधिकृत नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. हा विषाणू ३१ डिसेंबर २०१९ रोजी पहिल्यांदा चीनमध्ये आढळला होता.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एधानोम गेब्रेयेसुसने यांनी सांगितले की, करोना विषाणूला अधिकृत नाव देण्यात आले आहे. कोविड-१९ असे त्याचे नाव असून को म्हणजे करोना, व्ही म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिसीज (आजार) असा त्याचा अर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने करोनाला जगासाठी धोका असल्याचे म्हटले आहे. डिसेंबरमध्ये हा विषाणू आढळल्यानंतर चीनमध्ये १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४२ हजारहून अधिक जणांना या आजाराची लागण झाली आहे. आतापर्यंत जगातील २५ देशांमध्ये हा आजार पसरला आहे. हा विषाणू नेमका कसा निर्माण याबाबत शास्त्रज्ञांकडून शोध सुरू आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा