कराची : मोहम्मद अली जिना यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत हा मूर्खपणाचा होता अशी खरमरीत टीका पाकिस्तानचे भौतिक शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते परवेझ हुदभाय यांनी केली आहे. कराचीतील ’आदाब फेस्टिवल’कार्यक्रमात?परवेझ हुदभाय यांनी जिनांवर टीका केली.
मोहम्मद अली जिना हे उत्तम नेते होते, याबाबत दुमत नाही. मात्र, पाकिस्तानला काय हवे, पाकिस्तान कसा देश असेल याबाबत त्यांनी काहीही मांडणी केली नाही. वेगळ्या पाकिस्तानची मागणी करताना त्यांच्याकडे कोणताही दृष्टिकोन किंवा दूरदृष्टी नव्हती, असेही परवेझ हुदभाय यावेळी म्हणाले. पुढे परवेझ यांनी, बंगाली मुस्लिमांवर अत्याचार झाला असल्याचे सांगत त्यांनी पाकिस्तान सरकारलाही धारेवर धरले. मागील 73 वर्षांपासून पाकिस्तानी नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. पाकिस्तान सध्या गोंधळलेला देश आहे, अशी टीका त्यांनी केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा