नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याच्या तारखांची घोषणा झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारीला भारत दौर्‍यावर येणार आहेत. व्हाइट हाऊसने ही माहिती दिली. आपल्या भारत दौर्‍यावर ट्रम्प नवी दिल्ली आणि गुजरातला जातील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौर्‍यात त्यांची पत्नी मेलानिया याही त्यांच्याबरोबर असतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौर्‍यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. या दौर्‍यामुळे भारत व अमेरिका यांच्यातील संबंध आणखी दृढ होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हॉस्टनमध्ये ’हाऊडी मोदी’ कार्यक्रमात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आले होते. त्यावेळी भाषण करताना मोदी यांनी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाही केली होती. काही दिवस आधी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी डोनाल्ड ट्रम्प हे साबरमतीचा दौरा करणार असल्याचे म्हटले होते.

अमेरिकेतील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ’हाऊडी ट्रम्प’चे आयोजन केले जाऊ शकते. अमेरिकेत गुजराती वंशाचे नागरिक जास्त असल्यामुळे त्या अहमदाबादमध्ये या क्रार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतीय प्रवासी एक महत्त्वाची व्होट बँक आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा