नवी दिल्ली : चीनमध्ये धुमाकूळ घातलेला कोरोना विषाणूचा फैलाव हवेतूनही होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणू सूक्ष्म हवेमध्ये मिसळून हवेच्या माध्यमातून दुसर्‍या व्यक्तीस संक्रमित करीत असल्याचा दावा शांघायमधील अधिकार्‍यांनी केला आहे. हवेच्या माध्यमातून हा विषाणू पसरत असल्यामुळे त्यास ‘एयरोसोल ट्रान्समिशन’ म्हणतात. याआधी कोरोनो विषाणूच्या थेट संपर्कात आल्यानंतरच संक्रमण होत असल्याची खात्री करण्यात आली होती.
वैद्यकीय तज्ञांच्या मते, हे श्वासोच्छवासामुळे याचा संसर्ग पसरत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून उपाययोजनांबाबत जनजागृती करण्याचे आवाहन या अधिकार्‍यांनी केले आहे. थेट प्रसाराचा अर्थ असा आहे की जर एखाद्या संक्रमित व्यक्तीला शिंका किंवा खोकला आला तर व्हायरस जवळच्या श्वास घेत असलेल्या व्यक्तीमध्ये प्रवेश करेल. त्याच वेळी, जेव्हा विषाणू असलेल्या हवेचे सूक्ष्म कण वस्तूला स्पर्श करून एखादी व्यक्ती तोंड, नाक किंवा डोळा स्पर्श करते तेव्हा संपर्क प्रसारित होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चीन सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, एकाच ठिकाणी एकत्रित होण्याचे टाळावे, वेंटिलेशनसाठी खिडक्या उघडा, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि घरात फवारणी व साफसफाई सुरू ठेवावी, खासकरुन दाराची हँडल्स, जेवणाची टेबल्स आणि शौचालयाच्या जागा स्वच्छ ठेवा विशेष म्हणजे डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 803 लोकांचा बळी गेला आहे.
दरम्यान, चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील 150 लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. अवघ्या 15 सेकंदात एका व्यक्तीला ’कोरोना’ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील एका 56 वर्षीय व्यक्तीला 15 सेकंदात कोरोनाची लागण झाली. बाजारामध्ये फक्त 15 सेकंदासाठी महिलेच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.
कोरोनोमुळे मृतांची
संख्या 811 वर
कोरोनो विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या चीनमध्ये झपाट्याने वाढतच आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार रविवारी मृतांचा आकडा 811 वर पोहोचला आहे. काल एकाच दिवशी तब्बल 81 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हुबईचे आयोग्य अधिकार्‍यांनी आणखी 2147 जणांना कोरोनो विषाणूची लागण झाली असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे चीनमध्ये आतापर्यंत कोरोनो विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 36,690 इतकी झाली आहे.

पंतप्रधान मोदींकडून चीनला मदतीचा हात
भारताने आपला शेजारी असलेल्या चीनला कोरोनोच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना पत्र लिहून मदतीचा हात पुढे केला आहे. मोदी यांनी आपल्या पत्रात चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला आहे. याशिवाय वुहानमधील 650 भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी चीन सरकारने केलेल्या मदतीसाठी आभार मानले आहेत. करोना व्हायरसच्या संकटाशी सामना करण्यास भारत चीनला सहकार्य करण्यास तयार असल्याचे आश्वासन मोदी यांनी शी जिनपिंग यांना दिले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा