मुंबई – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील पीडित तरुणीच्या उपचारांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी प्रख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी दर्शविली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ‘पीडित तरुणीला किंवा तिच्या कुटुंबीयांना कोणी ओळखत असेल तर कृपया त्यांची माहिती मला द्या,’ असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

आपल्या ‘ट्विट’मधून आनंद महिंद्रा म्हणतात की, आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. मी वृत्त वाचून गप्प बसणार नाही. सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेल. जर कुणी पीडितेला किंवा तिच्या कुटुंबीयास ओळखत असेल तर मला कळवा, असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. कुटुंबाचे जवळचे स्नेही राजविलास कारेमोरे यांनी उद्योगपती महिंद्रा यांच्या भूमिकेचे स्वागत करीत मदतीची भावना दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा