बीजिंग : चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे नेमकी किती जीवितहानी झाली आहे, याबाबत अनेक चर्चा सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये जवळपास 24 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची चर्चा आहे. एका कंपनीचा डेटा लीक झाला. त्यात ही माहिती उघड झाली आहे. या बातमीमुळे जगभरात खळबळ माजली आहे.

चीन सरकारने कोरोनामुळे 563 जणांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, तैवान न्यूजच्या वृत्तानुसार मृतांचा खरा आकडा लपवण्यात आल्याची चर्चा आहे. टेन्सेन्ट ही कंपनी चीनमधील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक आहे. जगभरात ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचा डेटा लीक झाला असून त्यात मृतांच्या आकड्याबाबत माहिती देण्यात आली आहे.
टेन्सेन्टच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार चीनमध्ये आतापर्यंत 24 हजार 589 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 54 हजार 23 जणांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. टेन्सेन्टच्या दाव्यानुसार सरकारी आकडेवारीपेक्षा दहापट अधिकजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

या लीक झालेल्या डेटावरून गदारोळ सुरू झाल्यानंतर टेन्सेन्टने आपल्या संकेतस्थळावरील माहितीत बदल केला आहे. काही तांत्रिक कारणांमुळे टेन्सेन्टचा डेटा लीक झाला असल्याचा दावा काहींनी केला आहे. तर, काहीच्या दाव्यानुसार, जगभरात कोरोना व्हायरसने चीनमध्ये घातलेल्या थैमानाची माहिती व्हावी, यासाठीच हा डेटा मुद्दाम लीक केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा