वॉशिंग्टन – आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करत नसल्याबद्दल अमेरिकेने पाकिस्तानचा निषेध केला. 27 देशांच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी हे विधान केले. पाकिस्तानात हिंदूबरोबर होत असलेल्या छळाचा त्यांनी उल्लेख केला. इराकमध्ये याझिदी, पाकिस्तानात हिंदू, बर्मामध्ये मुस्लिम आणि नायजेरियात ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणार्‍या दहशतवादी, कट्टरपंथीयांचा आम्ही निषेध करतो असे पॉम्पिओ म्हणाले. पाकिस्तानात हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत. लग्नासाठी हिंदू मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा