पुणे : जगाच्या राजकारणाची ओळख तुमच्या घरातील महिलांना करून द्यावी. कारण स्त्री ही तुमची ताकद व मूकनायिका, तसेच घरातील सैनिक आहे. त्यांना मान दिल्याने पँथरच्या लढ्याला बळ प्राप्त होईल, असे मत दलित पँथरच्या केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ यांनी व्यक्त केले.

दलित पँथरचे संस्थापक व विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांचा स्मृती दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात स्मृती दिन साजरा करण्यात आला. तेव्हा अभिवादन सभेत मार्गदर्शन करताना मलिका ढसाळ बोलत होत्या. अभिवादन सभेच्या आरंभी भन्ते हर्षवर्धन यांनी बुद्धवंदना सादर केली. त्यानंतर मलिकाताईं ढसाळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन,महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पार्पण आणि दिवंगत पँथर नेते नामदेव ढसाळ व कै. पतंगराव कदम यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण केला. या प्रसंगी दलित पँथरचे केंद्रीय कार्याध्यक्ष यशवंत नडगम, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ, दलित पँथरचे प्रदेशाध्यक्ष अविश राऊत, सुरेश केदारे, घनश्याम भोसले, दलित सेनेच्या आरती साठे, सुभाष लाटकर , निलेश आल्हाट, अ‍ॅड. लक्ष्मी माने, सोनाली नवदूनगव यांनी मार्गदर्शन केले.

मलिका ढसाळ पुढे म्हणाल्या की, नामदेव ढसाळ यांनी दलित पँथर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक चळवळ व साहित्यातून प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रबोधनात्मक ताकद दिली आहे. प्रत्येक स्त्रीचा त्यांनी आदर केला आहे. प्रत्येक पुरूषांनी घरातील महिलांना मान दिला पाहिजे, राजकारण, समाजकारण, तसेच विविध कारणामुळे तुम्ही घराबाहेर असता. तेव्हा ती कुटुंबाची जबाबदारी घेऊन सांभाळत असते. ती तुमची ताकद आहे. यासाठी तिला जगाची ओळख असणे गरजेचे आहे.

नामदेव ढसाळ यांनी शोषितांना दलित पँथर संघटनेच्या माध्यमातून क्रांतीकारक बळ दिले. यातून क्रांतीच्या ज्वालामुखीची ज्योत निर्माण होऊन सर्वांना प्रेरणा दिली. दलित पँथरच्या चळवळीमुळे आज दिल्लीत जाऊन मंत्री बनून बसले, परंतु चळवळीचे त्यांना काही देणेघेणे दिसत नाही. आजही दलित समाजावर अन्याय होत आहे. शिवाय सामान्यांचे दैन्य संपले नाही. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दलित पँथर जोमाने काम करणार आहे. पिडीतांना न्याय मिळल्याशिवाय माघार घेणार नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे, माझी माणसे शासनकर्ती जमात व्हावी, असे झाले तरच बाबासाहेब आणि नामदेव ढसाळांच्या विचारांचे सार्थक होईल.

यशवंत नडगम म्हणाले की, आजही गावागावात पँथरची गरज आहे. दादांनी (नामदेव ढसाळांनी) पुण्यात 372 झोपडपट्ट्या वसवल्या, परंतु दादांच्या उपकाराची जाणीव लोकांना राहिली नाही. दादांचे विचारामुळे अन्य राज्यातच नव्हे तर भारताबाहेरही पँथर पोहचली. तामिळनाडूत पँथर कार्यकर्ते आमदार मंत्री बनले. आज कन्हैयाकुमार जी भाषणे करतोय त्याचे शब्द दादांचे आहेत. दादांच्या कवितांचे पुस्तक वाचाल तर राजकारणाचे वाघ बनाल.

अविश राऊत म्हणाले, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे, देशातील सरकार धर्मावर आधारित नागरिकत्व सुधारणा (एनआरसी) कायदा आणून भारतीय संविधानाची पायमल्ली करत आहे. एनआरसी लागू झाल्यास एससी, एनटी, ओबीसी भरडला जाणार आहे. एनआरसी कायद्याला विरोध हीच नामदेव ढसाळ यांना श्रद्धांजली ठरणार आहे.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय वंदगल, मुदस्सर शेख, जॅक्सन पानेम, रुपेश जगताप, पप्पू पाटील, प्रिन्स कांबळे, नितीन नायर, विल्यम नायडू, प्रशांत वाघमारे, बापू माने, लहू लांडगे, गणेश लांडगे, जर्नादन घायमुक्ते, श्रीकांत लोणारे, धीरज जाधव, मार्टिन जोसेफ व संजय कांबळे, स्वप्निल कांबळे, अरविंद मोरे, संजय लुटे, सतिश वाघेला, रमेश पारधे, विशाल ओव्हळ, गणेश म्हेत्रे, सुरेश नेटावटे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना दलित पँथरच्या केंद्रीय अध्यक्षा मलिका नामदेव ढसाळ व यशवंत नडगम, तसेच इतर .
- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा