मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार, जागतिक क्रिकेटमध्ये टी-२०, आयसीसी वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा तिन्ही स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा एकमेव कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या कारकिर्दीचा अस्त झाल्याची चर्चा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने क्रिकेटपटूंसोबतचे वार्षिक करार गुरुवारी जाहीर केले. या करारातून महेंद्र सिंह धोनीला वगळले आहे.

इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी २०१९ मध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. या पराभवानंतर धोनी भारताकडून खेळला नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा देखील काही महिन्यांपासून सुरु आहे.धोनीने काही दिवासांपूर्वी जानेवारी महिन्यात निवृत्तीसंदर्भात सांगू तसेच आपण यावर्षी आयपीएल स्पर्धा खेळणार असल्याचे सांगितले होते.

बीसीसीआयने गुरुवारी खेळाडूंसोबतचे वार्षिक करार जाहीर केले. या करारातून धोनीला वगळण्यात आले. बीसीसीआयने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी क्रिकेटपटूंना देण्यात येणारे मानधन बीसीसीआयने जाहीर केले. याआधी धोनीचा समावेश ग्रेड ए (पाच कोटी)मध्ये होता. धोनी भारतीय संघाकडून ९ जुलै २००९ रोजी अखेरचा सामना खेळला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा