‘जैश’च्या ५ दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर : प्रजासत्ताक दिनाला म्हणजे २६ जानेवारीला दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या ‘जैश ए महंमद’च्या ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी श्रीनगरमधील हजरतबल भागातून या दहशतवाद्यांना अटक केली. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

प्राणघातक हल्ल्याचा एक मोठा कट उधळत जम्मू काश्मीर पोलिसांनी या पाच दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दहशतवाद्यांनी २६ जानेवारीला श्रीनगरच्या आसपास आयईडी हल्ल्याचा कट आखला होता. या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे आढळली. पाचही जण काश्मीरमध्ये जैश ए महंमद या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेसाठी काम करत होते. या दहशतवाद्यांचा काश्मीरमधील दोन ग्रेनेड हल्ल्यात सहभाग असल्याचे ही समोर आले आहे. तपास यंत्रणांकडून या दहशतवाद्यांची कसून चौकशी होत आहे. आणखी दहशतवादी कारवायांची माहिती या दहशतवाद्यांकडे असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातूनही भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा