तीन दिवसांत जमा होईल खात्यावर

प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठ्या क्षणी जास्त आर्थिक मदतीची गरज असते. त्यासाठी पगारदारांसाठी त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) खात्यातील रक्कम मोठा आधार असतो. पण पीएफमधील रक्कम तात्काळ मिळत नाही. पण आता कर्मचारी भविष्य निधी संघटना ( EPFO ) लवकरच नोकरदारांसाठी खास भेट देणार आहे. EPFO कमिशनर सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पीएफची रक्कम अवघ्या तीन दिवसांत मिळणार असून सध्या यावर काम सुरू आहे. याची इपीएफओकडून चाचणी सुरू आहे.

ईपीएफओच्या सर्व खातेदारांसाठी एक युनिव्हर्सल अकाउंट नंबर प्रसिद्ध करत. हा नंबर सुरू असणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांचा मोबाइल, पॅन आणि आधार नंबरही डेटाबेसमध्ये अपडेट असावा. थोडक्यात KYC चा वापर करणाऱ्यांना आणि तीन दिवसांत PF चे पैसे मिळतील, असे ईपीएफओने ठरवले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा