१५ जणांचे कापले तिकीट

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ७० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. ‘आप’ने ४६ विद्यमान आमदारांना पुन्हा रिंगणात उतरविले आहे. तर, १५ विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली, तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पटपडगंज मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. ‘आप’ने यावेळी ८ महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. तिमारपूरमधून विद्यमान आमदार पंकज पुष्कर यांचे तिकीट कापत दिलीप पांडे यांना देण्यात आले. तर, रामचंद यांच्याऐवजी बवानामधून जय भगवान उपकार यांना रिंगणात उतविले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा