वाढत्या काँक्रीटीकरणाचा परिणाम

विजय चव्हाण

पुणे : महापालिकेच्या वतीने शहरातील रस्ते सरसकट सिमेंट काँक्रीटचे कारण्यात येत?आहेत. यामुळे पर्यावरणाची नहोत?असल्याचे पुढे आले आहे. शहरात रस्त्यांचे काँक्रीटकरण होत असल्यामुळे, पाणी जिरण्याचे प्रमाण कमी होत असून, याचा फटका रस्त्याच्या कडेला असणार्‍या झाडांना बसत आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार शहरात आगीच्या घटनांपेक्षा झाडे पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली?आहे. जानेवारी ते डिसेंबर-2019 मध्ये 975 आग लागण्याच्या घटना घडल्या; तर झाडे पडण्याच्या 1269 घटना घडल्या आहेत. हे प्रमाण आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार शहरात 2015 पासून वृक्ष कोसळण्याच्या घटनेत वाढ होत आहे. 2017 या एका वर्षात 1201 वृक्ष कोसळले;तर 2019 मध्ये हे प्रमाण वाढले आहे.

पर्यावरणवादी संघटना आणि उद्यान विभागानेसुद्धा निष्काळजीपणामुळे अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट केले आहे. रस्त्याच्या कडेला असणार्‍या झाडांच्या भोवती सुशोभीकरण केले जाते. या ठिकाणी ट्रीमिंग करण्यात येते. सिमेंट काँक्रीटीकरणामुळे पाणी मुळापर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होत चालली आहेत. या सर्व कारणांमुळे झाड पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली?असल्याचे बोलले जात आहे. याविषयी उद्यान विभागाच्या अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार शहरातील सोसायट्यांच्या मालकीच्या अंतर्गत रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात सिमेंट काँक्रीटीकरण झाले आहे. झाडाच्या कडेला सुशोभीकरणामुळे मातीच उरलेली नाही. यामुळे झाड कमकुवत होते. झाडाची वाढसुद्धा होत नाही. परिणामी पावसाळ्यात?अशी झाडे मुळासकट उन्मळून पडतात. उद्यान विभागाने पथ विभागाला याबाबत वारंवार सूचना केला आहेत; मात्र याचे पालन होताना दिसत नाही.

महानगरपालिकेने अंतर्गत रस्ते आणि मुख्य रस्त्यांचे सर्रासपणे सिमेंटीकरण करणे सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याचे पाझर फुटणे पूर्णपणे थांबले आहे. शहरातील अनेक भागांत पाणी शिरत आहे. झाडांची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालिका उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समितीने याबाबत निश्चित धोरण करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त शहर अभियंता अनिरुद्ध पावस्कर म्हणाले, ‘होय. वृक्ष कोसळण्यामागे सिमेंटकाँक्रीट हे एकमेव कारण नाही. रस्त्यांचे काम करताना झाड योग्य पद्धतीने राहील यासाठी खबरदारी घेण्यात येईल.’ अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रशांत रणपिसे म्हणाले, की खोडाच्या सभोवताली माती नसल्यामुळे झाडांची मुळे कमकुवत होतात आणि ती खाली पडतात. शहरात गेल्या काही वर्षांपासून वृक्षतोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

वर्ष आगीच्या घटना झाड कोसळण्याच्या घटना
2010 989 567
2011 1142 440
2012 1046 420
2013 1206 690
2014 1154 680
2015 1078 821
2016 1073 818
2017 1058 1201
2018 1353 936
2019 975 1269

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा