मॅनहॅटन : देशभरामध्ये सुधारित नागरिकत्व काद्याला विरोधाचे वातावरण असतानाच आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष सत्या नडेला यांनीही भारतामध्ये घडणाऱ्या घटना दु:खद असल्याचे मत व्यक्त केले.

“माझ्या मते भारतात सध्या जे काही सुरु आहे ते दु:खद आहे. परिस्थिती वाईट आहे,” असे मत नाडेला यांनी ‘बझफीड’चे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना व्यक्त केले. नाडेला हे मायक्रोसॉफ्टच्या मॅनहॅटन येथील कार्यक्रमात बोलत होते. बांगलादेशमधून आलेला एखादा व्यक्ती भारतातील एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष झाल्याचेही मला पहायला आवडेल अशी इच्छाही नाडेला यांनी व्यक्त केली.

“मला बांगलादेशमधून भारतात आलेला व्यक्ती भारतात एखादी कंपनी सुरु करताना किंवा थेट इन्फोसिसचा पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून पहायला आवडेल,” असे ही नडेला म्हणाले.

नडेला यांनी भारताबद्दल आपले मत व्यक्त करताना, “भारत हा असा देश हवा जिथे बाहेरच्या देशातील व्यक्तीने येऊन त्याची कंपनी सुरु करेल आणि त्याचा फायदा भारतीय समाज आणि अर्थव्यवस्थेला होईल,” अशी इच्छा व्यक्त केली.

“प्रत्येक देशाने आपल्या सीमा ठरवणे गरजेचे असते. प्रत्येक देश आपले राष्ट्रीय सुरक्षा धोरण ठरवून त्याप्रमाणे निर्वासितांसाठी धोरणे ठरतो. लोकशाहीमध्ये हे सर्व निर्णय त्या राष्ट्राचे लोक आणि तेथील सरकार चर्चा आणि वादविवादाच्या माध्यमातून नियमांमध्ये राहून घेतात. माझ्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. सांस्कृतिक वैविध्यता असणाऱ्या भारतासारख्या देशामध्ये जन्मल्यानंतर मी अमेरिकेमध्ये आलो. बाहेरुन आलेल्या व्यक्तीने सुरु केलेल्या कंपनीचा देशाला आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल अशी माझी इच्छा आहे,” असे नडेला म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा