नवी दिल्ली : देशातील वाढत्या महागाईवरुन काँग्रेसने मोदी सरकावर निशाणा साधत भारतात शाकाहारी असणे गुन्हा झाला आहे असा टोला लगावला. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ विरोधी पक्षांची बैठक बोलवावी आणि पुढील १५ ते ३० दिवसांत महागाई कमी करण्यासाठी काय रोडमॅप तयार केला आहे याची माहिती देत देशवासियांना दिलासा देण्याची मागणी केली.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हटले आहे की,“मुलभूत वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणार नाही इतके दर वाढले आहेत. २०१२-१३ नंतर पहिल्यांदाचा महागाई इतकी वाढली आहे.नरेंद्र मोदी मात्र शांत बसले आहेत. वाढत्या महागाईची भाजपला काहीही चिंता नाही”.

“भाज्यांचे दर ६० टक्क्यांनी तर डाळींचे दर १५ टक्क्यांनी वाढले आहेत. चिकनचे दर १० टक्क्यांनी वाढले आहेत. मसाल्यांच्या किंमती सहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. भारतात शाकाहारी राहणे आता गुन्हा झाला आहे. २०१४ मध्ये कांद्याची किंमत ८ रुपये किलो होती.आज ५० रुपये किलो आहे. लसूण २९० रुपये किलो झाला असून तो खाणं पाप झाले आहे,” असे यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले.

रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका करताना, सरकारला जनतेची पर्वा नाही. सरकार शासन नाही तर विभाजन करतेय असा आरोप केला. मोदी तुम्ही केवळ मौनव्रत ठेवून देशाच्या जनतेला महागाई, बेरोजगारीच्या आगीत झोकून देत विभाजनाच्या आडून जबाबदारी झटकू शकत नाही असे ही यावेळी ते म्हणाले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा