नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणात सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह (पुनर्विचार) अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळला. त्यामुळे निर्भयाच्या दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर २२ जानेवारीला अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

पतियाळा हाऊस न्यायालयाने दोषींना मृत्युदंड ठोठावल्या नंतर दोषी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी पुनर्विचार अर्ज दाखल केली होता. त्यावर आज, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्या.एन.व्ही.रमण्णा, न्या. अरुण मिश्रा, आर. एफ. नरीमन, आर. भानुमती, न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने एकमताने दोषींचा पुनर्विचार अर्ज फेटाळला.

दोषींकडे आता अखेरचा पर्याय

पुनर्विचार अर्ज फेटाळल्यानंतर राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल करण्याचा पर्याय आहे. राष्ट्रपती राज्यघटनेतील अनुच्छेद -७२ आणि राज्यपाल अनुच्छेद -१६१ नुसार दया अर्जावर सुनावणी घेऊ शकतात. याच दरम्यान राष्ट्रपती गृहमंत्रालयाकडून अहवाल मागवतात. मंत्रालयाकडून राष्ट्रपतींना शिफारस पाठवली जाते आणि त्यानंतर राष्ट्रपती दया अर्ज निकाली काढतात. राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला तर गुन्हेगारांच्या फाशीचा मार्ग मोकळा होतो. दया अर्ज निकाली काढण्यात अकारण विलंब झाला तर त्याआधारे गुन्हेगार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा