नवी दिल्ली: दरियागंज हिंसाचार प्रकरणी सुनावणीवेळी दिल्लीतील न्यायालयाने दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले. जामा मशिदीबाहेर शांततेने आंदोलन करू देण्यास अडचणी काय होत्या,असा सवाल तीस हजारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना केला. लोक कुठेही शांततापूर्ण आंदोलन करू शकतात. आंदोलन करण्यापासून रोखायला जामा मशीद ही काय पाकिस्तानात नाही, असे ही न्यायालयाने सुनावले.

दरियागंज हिंसाचारप्रकरणी आज दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावले. जामा मशिदीबाहेर आंदोलन करू देण्यात अडचण काय होती?, असा प्रश्न न्यायालयाने दिल्ली पोलिसांना केला. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर यांनी जामा मशीद येथे केलेल्या आंदोलनाशी संबंधित प्रकरणात सुनावणी झाली. त्यांनी पोलिसांच्या परवानगीशिवाय नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चाचे आयोजन केले होते. त्यांना पोलिसांनी अटक केली.

धार्मिक स्थळी आंदोलन करता येऊ शकत नाही असे कोणत्या कायद्यात लिहिलं आहे?, असा प्रश्न न्यायालयाने केला.लोक शांततेने कुठेही आंदोलन करू शकतात. आंदोलनाला परवानगी न द्यायला जामा मशीद काही पाकिस्तानात नाही. शांततापूर्ण आंदोलन तर पाकिस्तानातही करू दिले जाते,असे ही न्यायालयाने म्हटले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा