मुंबई : व्हीडिओकॉन समूहाच्या कर्ज प्रकरणी दोषी आढललेल्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांच्या विरोधात आयसीआयसीआय बॅंकेने कठोर भूमिका घेतली. कोचर यांनी एप्रिल २००६ ते मार्च २०१८ या कालावधीत घेतलेली वेतनवाढ, शेअर्स, बोनससह १२ कोटी परत मिळवण्यासाठी आयसीआयसीआय बॅंकेने उच्च न्यायालयात धाव घेतली.आपल्या कार्यकाळात कर्जदारांकडून कर्ज वसुलीचे आदेश देणाऱ्या कोचर यांच्यावर ही नामुष्की ओढवल्याने बॅंकिंग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रशिक्षणार्थी कर्मचारी ते बॅंकेच्या प्रमुख असा चंदा कोचर यांचा आयसीआयसीआय बॅंकेमधील प्रवास आहे. बॅंकेच्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून चंदा कोचर यांचा बॅंकिंग क्षेत्रात दबदबा होता. कोचर या जोधपूरच्या असून त्यांनी १९८४ मध्ये आयसीआयसीआय बॅंकेत प्रशिक्षणार्थी कर्मचारी म्हणून प्रवेश केला. २०११ मध्ये त्यांना पद्‌मभूषण पुरस्काराने गौरवले आहे. फोर्ब्स आणि फॉर्च्युन सारख्या मासिकांनी जगातील सर्वात प्रभावी १०० महिलांमध्ये कोचर यांना स्थान दिले. सलग आठ वर्षे त्यांचा ३० सर्वात प्रतिभाशाली महिलांच्या यादीत समावेश होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा