कुलगाम : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांबरोबर मोटारीतून जाताना अटक केलेला पोलीस अधिकारी देविंदर सिंग याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.’दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरहून दिल्लीत आणण्यासाठी १२ लाख रुपये मिळाले होते’, अशी कबुली देविंदर सिंगने दिली आहे.

भारतात प्रजासत्ताक दिनी घातपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अटकेत असलेल्या देविंदर सिंग याचे पोलीस विभागातून निलंबन केले आहे. याबरोबर लष्करविरोधी कारवाई केल्याने त्याला दिलेले सर्व पदके परत घेतली आहेत.

देविंदर सिंगची गुप्तचर विभाग, रॉ आणि पोलीस अशा सर्व यंत्रणांकडून चौकशी सुरु आहे. यात बरेच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. देविंदरने श्रीनगरमध्ये इंदिरा नगर येथील आपल्या राहत्या घरात दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा दिली होती. त्याच्या घरी छापे टाकले असता तीन एके-४७ रायफल आणि ५ हँड ग्रेनेड जप्त केले होते.

संसदेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरुशी या पोलीस अधिकाऱ्याचे कनेक्शन आहे का? याचा तपास होत आहे. पकडलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना आधी चंदीगड आणि नंतर दिल्लीला जायचे होते. देवेंद्र सिंग या दहशतवाद्यांना चंदीगड आणि दिल्लीला नेऊन सोडणार होता. त्यासाठी देविंदर सिंगला १२ लाख रुपये मिळणार होते, अशी माहिती त्याच्या तपासातून उघड झाली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा