गौरी लंकेश हत्या प्रकरण

बंगळुरू : गौरी लंकेश हत्याप्रकरणी मुख्य आरोपी ऋषीकेश देवडीकर याला सोमवारी कर्नाटकातील न्यायालयाने 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. देवडीकर याला चार दिवसांपूर्वी झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील कतरास येथून कर्नाटकातील विशेष तपास पथकाने अटक केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून देवडीकर फरारी होता. तो झारखंडमधील धनबादमध्ये ओळख बदलून राहत होता, याची माहिती एसआयटीला मिळाली. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कतरास येथे छापा टाकून त्याला बेड्या ठोकल्या. गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी त्यांच्या घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणी आतापर्यंत 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा