श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली. उत्तर काश्मीरमधील बऱ्याच भागांत हिमस्खलन झाले. त्याखाली दबून तीन जवान हुतात्मा झाले. तर एक जवान अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळते. कुपवाडा जिल्ह्यातील बऱ्याच भागांत हिमस्खलनही झाले. लष्कराने या ठिकाणी बचावकार्य हाती घेतले. बऱ्याच जवानांना सुखरूप बाहेर काढले.

बांदीपोरा आणि गांदरबल जिल्ह्यात हिमस्खलनाच्या घटना घडल्या. बर्फाखाली बरीच घरे दबली गेली. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने बचावकार्य हाती घेतले. आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले. बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेजमधील दासी बक्तुर गावात हिमस्खलन झाले. तेथील तीन घरे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली. गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर गावातही हिमवादळामुळे घरे उद्ध्वस्त झाली. बर्फाखाली दबलेल्या पाच जणांना वाचवण्यात यश आले. अन्य बेपत्ता लोकांचा तपास सुरू आहे. काल सकाळीही पावसामुळे जम्मूमधील जनजीवन विस्कळीत झाले होते. थंडीचे प्रमाणही वाढले आहे. पावसाचे पाणी रस्त्यांवर साचले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा