लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू झाला. डॉक्टर प्रशांत उपाध्याय असे त्यांचे नाव असून न्यायालयात त्यांची सुनावणी होणार होती. तुरुंगात झालेल्या बेदम मारहाणीनंतर पीडितेच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांनी त्यांच्यावर उपचार केले.

पीडितेच्या वडिलांवर उपचार केल्यानंतर याच डॉ. प्रशांत उपाध्याय यांनी त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले होते. या प्रकरणी वाद झाल्यानंतर सीबीआय तपास सुरू झाला. तेव्हा डॉ. उपाध्याय यांना निलंबित केले होते. त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले. सध्या उपाध्याय यांची फत्तेहपूर येथील रुग्णालयात त्यांची नेमणूक केली होती.डॉ. उपाध्याय यांचा आज संशयास्पद मृत्यू झाला.ते मधुमेहग्रस्त होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा