नवी दिल्ली : केरळमधील शबरीमला येथील भगवान अयप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल पुनर्विचार अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ही सुनावणी शबरीमला प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पुनर्विचार अर्जावर होत नाही. त्यावर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल,असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. शबरीमला प्रकरणात ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने जे मुद्दे सुनावणीसाठी पाठवले होते, त्यावर सुनावणी होणार आहे, असे न्यायालयाने सांगितले.

वेगवेगळ्या धर्मांमधील चालिरितींसंदर्भात महिलांसोबत होणाऱ्या भेदभाव प्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकते की नाही, यावर विचार करण्याची गरज आहे, असे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले होते. सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय खंडपीठ ६० अर्जावर सुनावणी घेत आहे. आता यावर पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होणार आहे. ‘या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अधिक वेळ जायला नको. त्यामुळे या प्रकरणी ‘टाइमलाइन’ निश्चित करायची आहे. बाजू मांडण्यासाठी किंवा युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, हे सर्व वकिलांनी आपसांत ठरवून सांगावे,’असे सरन्यायाधीश म्हणाले. महिलांना मंदिर प्रवेश, मशिदी, अग्यारींमध्ये प्रवेश आदी महत्वाचे मुद्दे ऐकून घेतले जातील,असे न्यायालयाने स्पष्ट केले.
वकिलांची भेट घेऊन टाइमलाइन निश्चित करणार

या प्रकरणात पुढील सुनावणी कोणत्या मुद्द्यांवर होईल, कोणते वकील कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतील? यासाठी न्यायालयाचे सेक्रेटरी जनरल सर्व वकिलांसोबत एक बैठक घेतील. त्यात टाइमलाइन निश्चित केली जाईल, असे सरन्यायाधीश बोबडे यांनी सांगितले. पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल. न्यायालयाने सर्व पक्षकारांना तीन आठवड्यांचा अवधी दिला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा