पाटणा : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या नागरिकत्व कायद्यावरून देशभरात विरोधाचे वातावरण निर्माण झाले.आज बिहारमध्ये विधानसभेबाहेर राष्ट्रीय जनता दल (राजद) च्या आमदारांनी सीएए आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जोरदार आंदोलन केले. बिहारमध्ये सीएए-एनआरसी लागू होणार नाही, अशी मागणी राजद आमदारांनी केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधानसभेत स्पष्ट केले की,बिहारमध्ये हे दोन्ही कायदे लागू केले जाणार नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते आणि आमदार भाई वीरेंद्र यादव यांच्यासह अन्य आमदारांनी विधानसभेबाहेर जोरदार आंदोलन केले. या सर्व आमदारांच्या हातात एनआरसी आणि सीएए विरोधातील फलक होते. नितीश कुमार म्हणाले, बिहारमध्ये एनआरसी लागू करण्याचा प्रश्नच येत नाही. हे केवळ आसाम संदर्भातील मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे हे बिहारमध्ये लागू होणार नाही, असे नितीश कुमार म्हणाले.

बिहार विधानसभेने डिसेंबर २०१९ मध्ये संसदेत मंजूर केलेल्या १२६ व्या संविधान संशोधन (अनुसूचित जनजाती आरक्षण विस्तारासाठी) ला स्वीकार करण्याचा मंजुरी आहे. जेडीयूचे उपाध्यक्ष असलेल्या प्रशांत किशोर यांनी रविवारी या संदर्भात एक ट्विट केले होते.त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की,”बिहारमध्ये नागरिकत्व आणि एनआरसी हे केंद्र सरकारचे दोन्ही कायदे लागू होणार नाहीत. त्यांच्या या ट्विटनंतर आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली. नितीश कुमारांच्या या भूमिकेनंतर केंद्र सरकार काय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा