नवी दिल्ली : फाशीची तारीख जसजशी जवळ येत आहे तशी निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांची भीतीने गाळण उडाली आहे. चारही दोषींच्या वागण्यात बराच बदल झाला असून, चौघांपैकी तिघे हिंसक, तर एक जण अगदी शांत बसला आहे. त्यात दोषी मुकेश सिंहची आई भेटायला आली असता, आईला भेटल्यानंतर त्याला रडू कोसळले.

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात फाशीची शिक्षेची तारीख आणि वेळ निश्चित झाल्यापासून या चौघा गुन्हेगारांच्या वागण्यात बदल झाल्याचे समोर येत आहे. काल मुकेश सिंहला आईच्या भेटीची परवानगी दिली. आईला भेटल्यानंतर तो भावुक झाला आणि रडला. त्याच्या आईने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. क्युरेटिव्ह आणि दया अर्जाचा पर्याय असल्याचे सांगून तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो शांत झाला. यावेळी मुकेशने वडील आणि भावाबद्दल विचारपूस केली. दरम्यान, दोषींना नियमानुसार आठवड्यातून दोन वेळा कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. फाशी देण्याआधी अखेरच्या भेटीबाबत कुटुंबीयांना माहिती दिली जाईल. फासावर लटकावल्यानंतर कुटुंबीय दोषींच्या सर्व वस्तू घरी घेऊन जाऊ शकतील. तुरुंगातील सूत्रांच्या माहितीनुसार, निर्भयाचे गुन्हेगार तुरुंगात कुणाशीही बोलत नाहीत. मुकेश, अक्षय, पवन हे तुरुंगातील कर्मचार्‍यांशी जेवणावरून वाद घालत होते. तर चौथा दोषी विनय शर्मा हा शांत बसला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा