कोरेगाव :वाहतूक पोलिस दुचाकीस्वारांना अडवून पैसे उकळतात. तर उलट अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष करून हप्ते घेत असल्याने यांच्या विरोधात क्रांती मजदूर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. कोरेगाव पार्क येथील बार्टी कार्यालयाच्या जवळील वाहतूक विभागा समोर धरणे आंदोलनाला क्रांती मजदूर सेनेचे कार्यकर्ते बसले. मुख्य चौकात आमदार निवास ही शासकीय इमारत असल्याने बघ्याची गर्दी झाली.कोरेगाव पार्क व पुणे स्टेशन येथे बरेच दिवसांपासून अवैध वाहतुकाची सुळसुळाट सुरू असून यातून वाहतूक पोलिसांना हप्ते मिळत असल्याने वाहतुक पोलिस कोणीतच कारवाई करत नाही. यामुळे नागरिकांना व बाहेरगाव ये-जा करण्यार्‍या प्रवशांना नाहक त्रास होत आहे. तरीही पोलिस याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच या भागात बऱ्याच बेकायदा टँकर वाहतुक,अवजड वाहतूक,अनाधिकृत, क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी वाहतूक बरेच विद्यार्थ्यांना एकाच रिक्षात बसून विद्यार्थी गुदमरतात असे वाहनांची वाहतूक होत आहे.

या शिवाय पुणे स्टेशनला दररोज मुबंईला जाणार्‍या खासगी वाहनांची बेकायदा गर्दी होत आहेत. मात्र एखाद्या सामान्य नागरिकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्वरित पाठीमागून पाचशे रूपयांचा दंड होत आहे. शहरातील बऱ्याच चौकात पैसे उकळण्यासाठी वाहतूक पोलिस सात ते आठ जण एक चौकात थांबत असून दंडाच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे सर्व कार्यकर्त्यांनी सांगितले.

हा सर्व प्रकार लवकर थांबले पाहिजे तसेच हप्ते गोळा करणार्‍या पोलिसावर कारवाई झाली पाहिजे अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे असा कार्यकर्त्यांनी इशारा दिला आहे.वाहतूक विभाग उपायुक्त ,तसेच आयुक्तांना बऱ्याचदा या बाबतचे तक्रारी निवेदन देऊन कारवाई होत नसल्याने आंदोलनाची वेळ आली.

वाहतुक विभागाच्या वसुली बहाद्दूरांची चौकशी केल्याशिवाय धरणे आंदोलन मागे घेणार नाही असे कार्यकर्त्यांनी म्हटले.यावेळी संघटनेचे संस्थापक अर्जुन ओहोळ, प्रदेशाध्यक्ष मुजीब पठाण, शहर अध्यक्ष कुलदिप वाल्हेकर, पश्चिम महाराष्ट्राचे दिपराज गायकवाड,नंदुभाऊ चितारे, चेतन पाटोळे, विकास वाघमारे, अशोक मोरे, शमिना बागवान, संतोष अर्जूनकर, किरण कतारी, राधिका कोरडे, आदी उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा