मुंबई : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाने निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर जागतिक कमॉडीटी बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली.सराफ बाजारात आज सोने प्रती दहा ग्रॅमसाठी २३६ रुपयांनी स्वस्त झाले. सोन्याचा भाव ४०४३२ रुपयांवर आला.मागील आठवडाभरात देशातील कमॉडीटी बाजारात (एमसीएक्स) सोने १५०० रुपयांनी स्वस्त झाले असून सोन्याचा भाव ३९७८० रुपयांपर्यंत खाली आला.

मध्य-पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोन्याच्या किमतींनी उसळी घेतली होती.’एमसीएक्स’मध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ४१२९३ रुपयांवर गेला होता. मात्र अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याने सोने स्वस्त झाले आहे. सोन्याचा भाव आज ०.२३ टक्क्याने कमी झाला. तो ३९७८० रुपये झाला आहे. चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. चांदीचा भाव ४७७५५ रुपये आहे. यात ०.३३ टक्के घसरण झाली. चलन बाजारात रुपयाचे मूल्य वधारत असल्याने सोन्याला फायदा होत आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा