दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या. ‘आप’ने शनिवारी ट्विट केलेल्या एका गाण्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या गाण्यावरून भाजपने आम आदमी पार्टी विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून ५०० कोटींचा दावा ठोकला.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी आपवर या व्हिडिओवरून जोरदार टीका केली.आपने ट्विट केलेल्या व्हिडिओ मनोज तिवारी आहेत. एका भोजपुरी अल्बममधील मूळ गाण्यात बदल करून ‘आप’ने ‘लगे रहो केजरीवाल’ हे आपचे प्रचारगीत व्हिडिओला लावल्याचे तिवारी यांनी सांगितले.भोजपुरीतील मूळ व्हिडिओत मनोज तिवारी दिसत आहेत.

आम आदमी पक्षाला त्यांच्या प्रचार गीतासाठी माझ्या व्हिडिओचा वापर करण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवालही तिवारी यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.तर,अब्रु नुकसान झाल्याप्रकरणी ५०० कोटी रुपयांचा दावा केल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा