नवी दिल्ली : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणार्‍या एका पुस्तकाचे रविवारी भाजपच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आले. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर मोठे वादंग निर्माण झाले असून देशभरातून भाजपवर टीका होत आहे. तात्काळ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करतानाच समाज माध्यमातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
दिल्लीत भाजप नेते जयभगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिले आहे. येथील भाजप कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. दिल्लीत लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने धार्मिक सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन केले होते. पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याचे जय भगवान गोयल यांनी ट्विट केले. यानंतर समाज माध्यमातून रोष व्यक्त केला करण्यात आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा