उस्मानाबाद : फादर फ्रान्सिस दिब्रिटो ज्येष्ठ आहेत. त्यांचा मला आदरच आहे. मी त्यांच्या विरोधात कशी बोलेन? वृत्तवाहिन्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, असे मावळत्या संमेलनाध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी शनिवारी सांगितले.
संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी भाषणात देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर डॉ. ढेरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर झळकले. त्यावर बोलताना डॉ. ढेरे म्हणाल्या, संमेलनाध्यक्षांच्या भाषाणातील एकही मुद्दा मी खोडून काढला नाही. खोडून काढण्याचे काही कारणही नाही. त्यांचे मुद्दे मी कशी खोडून काढेन? अशा शब्दांत त्यांनी वृत्तवाहिन्यांनी विपर्यास केला असल्याचे स्पष्ट केले.
साहित्यिकांवर कुठलाही दबाव नाही. आजही अनेक जण आपले विचार लिखाणाच्या माध्यमातून मांडत आहेत. एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतला आहे, असे होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असे मला वाटत नाही. सर्व जण आज सुजाण आहेत, असे काही होणार नाही याचा मला विश्वास आहे, असे डॉ. ढेरे म्हणाल्याचे वृत्त वृत्तवाहिनीवरून दिले गेले होते.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा