मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसेनंतर दीपिका पदुकोण जेएनयू परिसरात गेली होती. तिने हिंसेविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात भाग घेतला. दीपिकाच्या या निर्णयाचे काहीजण कौतुक करत आहेत तर काहींनी तिचा आगामी सिनेमा छपाकवर बहिष्काराची मागणी करत आहेत.

पाकिस्तानमधूनही दीपिकाचे समर्थन करणारे एक ट्वीट आले. या ट्वीटमध्ये पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी एक चूक केली. याच चुकीमुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आसिफ गफूर यांनी दीपिकाच्या जेएनयू कॅम्पसमध्ये दाखवलेल्या पाठिंब्याचे कौतुक केले होते. त्यात आसिफ यांनी दीपिकाच्या आडनावाचे स्पेलिंग चुकीचे लिहिले. नेमके याचमुळे ते ट्विटरवर ट्रोल होत आहेत. यानंतर गफूर यांनी ते ट्वीट डिलीट केले.

असे होते ते ट्विट
गफूर यांनी ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘सत्य आणि तरुणांसाठी उभे राहिल्याबद्दल दीपिका पदुकोण तुझे अभिनंदन. कठीण काळात तू शौर्य आणि सन्मान दाखवलास. मानवता अग्रणी आहे.’ या ट्वीटमध्ये गफूर यांनी इंग्रजीमध्ये हॅशटॅग दीपिका पदुकोण लिहिताना तिच्या आडनावातील शेवटचे अक्षर लिहिले नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा