कोरेगाव पार्क : पुणे रेल्वे स्थानकाच्या बाजूच्या एका खोलीत एक रेल्वेच्या कर्मचार्‍याने शासकीय इमारतीच स्वतःचे कार्यालय सुरू केले असून येथेच वेगेवेगळ्या गोष्टींचे अनधिकृत व्यवहार होत असल्याचे समोर आले.

पुणे रेल्वे स्थानकाच्या गेट नंबर १ च्या बाजूस रेल्वे ढाब्या जवळ ५०० ते ६०० स्कु.फुटाची खोली रेल्वे मालकीची इमारती आहे. परंतु एक कर्मचारी स्वतःचे कार्यालय थाटून पुणे स्टेशन परिसरातील गुंडाच्या मदतीने वेगवेगळ्या गोष्टींचे अनधिकृत व्यवहार करत असल्याचे उघडीस आले. ही शासकीय इमारतील खोली गुंडाचा अड्डाच बनला आहे. गुंडाकरवी हा कर्मचारी रेल्वेच्या पार्सलचे हेराफेरी करण्यासाठी व रेल्वे स्थानकावरील बनावट वस्तू व खाद्य पदार्थ विक्रेते यांच्या ही अधिक पैसे घेऊन व्यवहार करत असल्याचे उघडी आले असून याला वरिष्ठ अधिकार्‍यांचा हात असल्याची ही स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा आहे.

एकट्या कर्मचार्‍याला एवढी मोठी खोली कशी दिली आहे. याच खोलीत अवैध व्यवहार सुरू आहे. शिवाय रात्रीला याच खोली अश्लिल चाळे होत आहेत तसेच प्रवाशांना धमकी देऊन पैसे उकळले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. देशातील पुणे रेल्वे स्टेशन स्मार्ट इंडिया पैकी एक नावजलेले रेल्वे स्थानक आहे. परंतु काही रेल्वेचे कर्मचारी ही पुणे स्टेशनची ख्याती बदलत आहेत.अशा कर्मचारी व अधिकार्‍याची सखोल चौकशी करून त्वरित निलंबित करावी अशी मागणी सर्व संघटनांचे कार्यकर्ते करत आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा