दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक आचारसंहिता आजपासूनच लागू केली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

दिल्ली विधानसभेची २२ फेब्रुवारी रोजी मुदत संपणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने पूर्ण तयारी केल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीत १३७५० मतदान केंद्रांवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना १४ जानेवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक अर्ज २१ जानेवारीपर्यंत दाखल करता येणार आहे. तर, ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा