नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. वस्तू आणि सेवा कराच्या उत्पन्नात सलग दुसर्‍या महिन्यात वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये १ लाख, ३ हजार १८४ कोटींचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला आहे. त्याआधी, नोव्हेंबरमध्ये १,०३,४९२ कोटी जमा झाले होते. तर, ऑक्टोबरमध्ये ९५,३८० कोटी,सप्टेंबरमध्ये ९१,९१६ कोटी जमा झाले होते. एकूण जीएसटीपैकी केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) १९,९६२ कोटी, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) २६,७९२ कोटी वसूल झाले आहे. एकात्मिक जीएसटी (एसजीएसटी) २६,७९२, तर उपकर ८,३३१ कोटींचा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा