स्वयंघोषित स्वामी नित्यानंद आता पुन्हा एकदा चर्चेत आला. साधारण दहा वर्षापूर्वी सेक्स सीडी प्रकरणामध्ये अडकलेल्या नित्यानंदने देशातून पलायन केले. त्यांनतर त्याने दक्षिण अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या जवळ एक बेट विकत घेतले असून त्या बेटाला देश म्हणून घोषित केले. नित्यानंदने या भूभागाला ‘कैलास’ असे नाव दिले असून हे जगातील सर्वोत्कृष्ट हिंदूराष्ट्र असल्याचे म्हटले. या भूभागाल संयुक्त राष्ट्रांनी मान्यता द्यावी अशी विनंती देखील केली. कहर म्हणजे या भूभागाच्या निर्मितीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करत एका संकेतस्थळाद्वारे देणगी गोळा करण्यासही सुरुवात केली.

‘कैलास’ या देशाच्या वरील माहितीनुसार, ‘कैलास हा सीमांचे बंधन नसणारा देश आहे. हा देश जगभरामधून हकलवून लावण्यात आलेल्या हिंदू लोकांनी एकत्र येऊन बनवला आहे. आपल्याच देशात हिंदू धर्माचा अभ्यास करण्याचा हक्क गमावलेल्या लोकांनी वसवलेला हा देश आहे.’ या देशाचा वेगळा पासपोर्ट असून नित्यानंदने वेबसाईटवर त्याची कॉपीही अपलोड केली आहे.

या वेबसाईटवरील माहितीनुसार विज्ञान, योग, ध्यान आणि गुरुकूल शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणारा हा देश आहे. या देशामध्ये आरोग्य सेवा, शिक्षण आणि जेवण मोफत उपलब्ध करुन देणार आहे.नित्यानंदने आता जगभरातील लोकांना या देशाचा नागरिक होण्यासाठी आमंत्रित केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा