बाहरी : सुदानमधील सिरॅमिक कारखान्यात झालेल्या एलपीजी टँकरच्या भयानक स्फोटात २३ जणांचा मृत्यू तर १३० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये १८ भारतीयांचा समावेश आहे.ही माहिती सुदानमधील भारतीय दूतावासाने दिली.
सुदानच्या बाहरी भागात असणाऱ्या सीला सिरॅमिक कारखान्यातील स्फोटानंतर मंगळवारी १६ भारतीय बेपत्ता झाले होते.भारतीय दूतावासाने त्यांच्या अधिकृत पत्रकात १८ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले.
बेपत्ता असलेले काही जण मृतांच्या यादीमध्ये असू शकतात. मृतदेह पूर्णपणे भाजलेले असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण आहे.या स्फोटानंतर दूतावासाने बेपत्ता झालेले, रुग्णालयात दाखल असलेले तसेच बचावलेल्यांची यादी प्रसिद्ध केली.दूतावासाच्या माहितीनुसार सात जण रुग्णालयात असून चौघांची प्रकृती गंभीर आहे.
बचावलेल्या ३४ भारतीयांची सलुमी सिरॅमिक फॅक्टरीच्या कारखान्यात निवासाची व्यवस्था केली आहे.या घटनेनंतर सुरक्षेची आवश्यक उपकरणे उपलब्ध नसल्याचे समोर आले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा